Poladpur 7th January 2020 Sundarrao More Arts,Commerce and Science College of Poladpur has announced R D Chitre Inter Collegiate elocution competition to be held on Thursday 30th January 2020. The competition is conducted in Marathi language. The details of the same is given in the following pamphlet. Interested students should contact on the given mobile number for their registration. The competition is organised in Association with Sahyog Pratishthan, NGO working in Poladpur area in the field of education and social service. Principal Dr Deepak Raverkar has appealed for large number of participation in the elocution competition.
सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये ३० जानेवारी रोजी रा. धों. चित्रे स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धचे आयोजन*
७ जाने २०२० शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोलादपूर येथे गुरुवार दि ३० जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता रामचंद्र धोंडदेव चित्रे स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ दीपक रावेरकर व उपप्राचार्य प्रा सुनिल बलखंडे यांनी दिली आहे. पोलादपूर येथील सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या प्रायोजकत्वाखाली गेली अकरा वर्षाहून अधिक काळ सदर स्पर्धा संपन्न होत आहे. दक्षिण रायगड व उत्तर रत्नागिरी ( नागोठणे ते चिपळूण ) या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी या वर्षी १ आजचा महाविद्यालयीन युवक व समाज माध्यमे २ महाराष्ट्राच्या विकासकामांचा प्राधान्यक्रम – आवश्यकता व वास्तविकता ३ माहिला अत्याचार प्रतिबंध – कठोर कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि प्रबोधन हे विषय निर्धारित केले असून स्पर्धेमधील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक – रू १५०१ , द्वितीय क्रमांक – रू १००१ व तृतीय क्रमांक रू ७०१ अशा स्वरूपातील रोख रकमेची बक्षिसे व प्रमाणपत्रे स्पर्धेच्या दिवशीच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. इच्छुक विद्यार्थी व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख प्रा सौ स्नेहल कांबळे ( मो. ९४२२०९५२९७ ) किंवा संयोजन समिती सदस्य प्रा डॉ रविंद्र सोमोशी ( मो. ९४२०८३६८३३ ) प्रा सुनिल गवळी ( मो. ८८८८८६०८६१ ) प्रा सुदर्शन दवणे ( मो. ९०९६२०२१६० ), कार्यालय अधीक्षक श्री मुकूंद पंदेरकर ( ०२१९१-२४०२२१)यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.