विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी

या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या आई/वडील/पालकांनी आपल्या पाल्याचा अभ्यास तसेच वर्तनाबद्दल जागरुक असावे. पाल्याची वर्गामधील उपस्थिती. वर्तन, परीक्षांचे निकाल, अभ्यासाव्यतिरिक्त त्याचे वर्तन याबाबत पालकांना माहिती कळविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परंतू विशेषतः खालील गोष्टींच्याअ संदर्भात पालकांचे अधिक सक्रीय सहकार्य अपेक्षित आहे.

१) सर्व परीक्षांना किंवा स्वाध्यायांना आपला पाल्य उपस्थित राहतो का? याची पालकांनी खात्री करुन घ्यावी व योग्य कारणामुळे आपला पाल्य परीक्षांना किंवा स्वाध्यायांना उपस्थित राहू शकत नाही तर पालकांनी खात्री पटवून द्यावी.
२) आपल्या पाल्याच्या वर्तनासंदर्भात महाविद्यालयाकडून पत्र/फोन आल्यास पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यावी.
३) पुष्कळदा आपल्या पाल्याचा महाविद्यालयातील अभ्यास कसा चालला आहे याची पालकांना काहीच कल्पना नसते. परीक्षेमध्ये त्याला मिळणारे गुण किंवा त्याची वर्तणूक या बाबतीत महाविद्यालयास एखादेवेळी कडक उपाययोजना करणे भाग पडते. सर्व परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यास पालकांना त्याची कल्पना येते. सर्वांना त्याचा त्रास सोसावा लागतो व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते, म्हणून पालकांनी प्राचार्य व प्राध्यापक यांच्याशी अधून मधून संपर्क ठेवणे इष्ट आहे.
४) विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेतील तीन महत्त्वाचे घटक आहेत. त्या दृष्टीने पालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर अधिकारी वर्ग यांना योग्य ते सहकार्य करावे.